IPL 2023 : कोलकातासाठी दुष्काळात तेरावा! कर्णधार अय्यर तर गेलाच, पण आजून दोन दिग्गज खेळाडूही बाहेर? : IPL Cricket News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipl 2023-kkr-got-another-big-shock-nitish-rana-was-also-injured-after-shreyas-iyer and lockie ferguson

IPL 2023 : कोलकातासाठी दुष्काळात तेरावा! कर्णधार अय्यर तर गेलाच, पण आजून दोन दिग्गज खेळाडूही बाहेर?

Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023चा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. पाठीच्या दुखापतीमुळे संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर या संपूर्ण मोसमातून बाहेर पडणे जवळपास निश्चित असताना, या हंगामात संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला दुखापत झाल्याची बातमीही समोर आली आहे. त्याचबरोबर केकेआर संघाचा आणखी एक खेळाडू नितीश राणालाही सराव सत्रादरम्यान दुखापत झाली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खेळाडूंनी घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर सराव सुरू केला आहे, यामध्ये आतापर्यंत संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू सामील झाले आहेत. एका स्पोर्ट्स वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सराव सत्रादरम्यान नितीश राणाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. नेटवर फलंदाजीचा सराव करताना राणाला दुखापत झाली होती.

नितीश राणाने प्रथम नेटवर वेगवान गोलंदाजांचा सामना केला, तर दुसऱ्या बाजूला फिरकी गोलंदाजांचा सामना केला, त्यानंतर तो थ्रो-डाऊनसमोर सराव करण्यासाठी जात होता, त्याचवेळी त्याच्या डाव्या गुडघाला चेंडू लागला. यानंतर नितीशला तत्काळ मैदानाबाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी पुढील सरावात भाग घेतला नाही.

आयपीएलच्या आगामी हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघ आपला पहिला सामना पंजाब किंग्ज संघाविरुद्ध 1 एप्रिल रोजी मोहालीच्या मैदानावर खेळणार आहे. यानंतर संघ 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध घरच्या मैदानावर दुसरा सामना खेळेल.

केकेआरच्या संघाला श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत आपल्या संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा करायची आहे, ज्यामध्ये नितीश राणा व्यतिरिक्त सुनील नरेन आणि शार्दुल ठाकूर यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.