IPL 2023 : मुंबईकर कनेक्शन! शार्दुलसाठी धोनी, पांड्याची फिल्डिंग मात्र बाजी मारली KKR च्या अय्यरने

IPL 2023 Kolkata Knight Riders Traded Shardul Thakur
IPL 2023 Kolkata Knight Riders Traded Shardul Thakur esakal

IPL 2023 Kolkata Knight Riders Traded Shardul Thakur : आयपीएल 2023 च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला चिवट मुंबईकर शार्दुल ठाकूरला आपल्या गोटात ओढण्यात यश आले आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दूलला ट्रेड केले आहे. केकेआरने आयपीएल 2023 साठीची ट्रेडिंग विंडो बंद होण्यापूर्वी ही खेळी खेळली. शार्दुलला आपल्या संघात सामील करण्यासाठी त्याचा जुना संघ एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेते गुजरात टाययन्स देखील इच्छुक होते. पंजाब किंग्जने देखील प्रयत्न केले होते. मात्र शार्दुल श्रेयसच्या गळाला लागला.

IPL 2023 Kolkata Knight Riders Traded Shardul Thakur
Michael Vaughan : इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो, भारतातील वर्ल्डकपमध्ये भारत फेव्हरेट हा मूर्खपणा

शार्दुल ठाकूर सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तो न्यूझींलडमधील वनडे मालिका खेळण्यासाठी टीम इंडियासोबत गेला आहे. शार्दुल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2022 च्या लिलावात 10.75 कोटी रूपये खर्चून खरेदी केले होते. मात्र यंदाच्या हंगामात तो केकेआरच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर हे दोघेही मुंबई संघाकडून खेळतात. आयपीएल 2022 मध्ये शार्दुल ठाकूरने 14 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी ही 9.79 इतकी होती. तर फलंदाजीत त्याने 138 च्या स्ट्राईक रेटने 120 धावा केल्या होत्या.

IPL 2023 Kolkata Knight Riders Traded Shardul Thakur
मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

आयपीएलची ट्रेडिंग विंडो ही मंगळवारी बंद होणार आहे. यापूर्वीच केकेआरने शार्दुलला गळाला लावत कल्ला केला. शार्दुल हा ट्रेडद्वारे केकेआरमध्ये सामील होणारा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी लॉकी फर्ग्युसन आणि रहमतुल्ला गुरबाजला केकेआऱने गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com