थालावर चेन्नई फिदा! IPLआधी धोनी रंगवतोय स्टेडियममध्ये खुर्च्या : IPL 2023 MS Dhoni News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 MS Dhoni News in Marathi

IPL 2023 MS Dhoni : थालावर चेन्नई फिदा! IPLआधी धोनी रंगवतोय स्टेडियममध्ये खुर्च्या

IPL 2023 CSK MS Dhoni Video : इंडियन प्रीमियर लीग 2023ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेटमध्ये फलंदाजी करत प्रचंड घाम गाळत आहे. 42 वर्षीय क्रिकेटपटूने आपल्या तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही. दरम्यान कॅप्टन कूलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियम या संघाच्या घरच्या मैदानावर तो जर्सीच्या रंगात खुर्ची रंगवताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीचा रंग सुरुवातीपासूनच पिवळा आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, धोनी स्टँडमधील खुर्चीवर पेंट स्प्रे करताना दिसत आहे. आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वी स्टँडच्या देखभालीचे काम सुरू आहे. खालील व्हिडिओमध्ये तुम्ही धोनीला स्प्रेसोबत दिसत आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ 31 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या गुजरात जायंट्सविरुद्ध आपली मोहीम सुरुवात करेल.

आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स 2 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या 2 सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील हंगाम चेन्नईसाठी चांगला नव्हता. 4 वेळचा चॅम्पियन संघ गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर होता.

महेंद्रसिंग धोनी या वर्षीच्या आयपीएलमध्ये सीएसकेचे नेतृत्व करेल आणि अफवा आहेत की हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो, परंतु या बातमीची पुष्टी करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही. आयपीएल 2023 च्या आधी वेगवान गोलंदाज दीपक चहरने सर्व अंदाज खोडून काढले.