IPL 2023: MS Dhoni चाहत्यांना देणार धक्का; त्याच्यासाठी हा सीजन...

कॅप्टन कुलने सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी...
MS Dhoni
MS Dhoniesakal

टीम इंडिया टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडताच सर्वाना आठवण आली ती म्हणजे एम एस धोनीची. कॅप्टन कुलने सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली अजूनही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. मात्र, आगामी सीजनमध्ये तो चाहत्यांना मोठा देणार असल्याचे संकेत वर्तवण्यात येत आहेत. (IPL 2023 MS Dhoni retires Team India BCCI Krida News )

आगामी सीजनसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याबरोबरच संघाने पुढील २०२३ च्या सीजनसाठी आपल्या कर्णधाराचे नावही जाहीर केले आहे. चेपॉकमधील चेन्नई सामना पाहण्यासाठी तीन वर्षांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांना एमएस धोनी पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

दरम्यान, २०२३ च्या आयपीएल नंतर धोनी चेन्नई सुपर किंग्ससह आयपीएलला देखील रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. 41 वर्षीय धोनीला सलग तीन वर्षे निवृत्तीबद्दल विचारले जात आहे, परंतु प्रत्येक वेळी तो हा प्रश्न टाळतो.

मात्र, धोनीने प्रत्येक वेळी चेन्नईत खेळताना निवृत्ती स्वीकारली होती. यावेळी धोनीचे ते स्वप्न पूर्ण झाले तर कदाचित तो निवृत्तीही जाहीर करू शकतो. असे संकेच क्रिकेट जगतात वर्तवण्यात येत आहेत.

टीम इंडियाची महत्वपूर्ण जबाबदारी घेणार हाती

आयसीसीच्या तिन ट्रॉफीचा मानकरी असलेला कर्णधर एम एस धोनीला टी२० क्रिकेटबाबत महत्वाची जबाबदारी देण्याची चर्चा आहे. बीसीसीआय कडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली तरी एम एस कडे महत्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

एम एस धोनीच्या रिटायरमेंटनंतर भारताने आजपर्यत आयसीसीची ट्रॉफी जिंकलेली नाही. धोनीकडे संघाची जबाबदारी असल्यास उत्तम प्रदर्शनासह लक फॅक्टर देखील भारतीय क्रिकेट संघाकडे चालून येईल अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे. तरी बीसीसीआय काय निर्णय घेणार, त्या निर्णयावर एम एस धोनी काय प्रतिक्रीया देणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com