
IPL 2023: आयपीएलमध्ये नवा नियम; आता किती खेळाडू खेळणार?
आगामी आयपीएल स्पर्धेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. इम्पॅक्ट प्लेयर' या नियमानुसार, आता संघाला नाणेफेकीदरम्यान, प्लेइंग इलेव्हनसह त्यांच्या चार पर्यायी खेळाडूंची घोषणा करावी लागणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये आता ११ नव्हे तर १५ खेळाडू खेळणार. (IPL 2023 season Impact Player Rule Team players BCCI CSK MI)
काय आहे नियम?
'इम्पॅक्ट प्लेयर' नियमानुसार, संघ कोणत्याही एका खेळाडूला पर्याय म्हणून मैदानात उतरवू शकतील. नाणेफेकीच्या वेळी संघांना प्लेइंग इलेव्हनसह त्यांच्या चार पर्यायी खेळाडूंची घोषणा करावी लागेल.
या चार खेळाडूंपैकी संघ कोणत्याही एका खेळाडूला 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून मैदानावर पाठवू शकेल. बदली खेळाडूला सामन्याच्या 14व्या षटकापर्यंतच मैदानात उतरवता येईल. त्यानंतर त्याला काही अर्थ उरणार नाही.
इम्पॅक्ट प्लेअर रुल आहे तरी काय?
या नियमानुसार खेळ सुरू होताना जेव्हा टॉस केला जातो तेव्हा प्रत्येक संघाचा कर्णधार त्यांचे ११ नियमित खेळणाऱ्या खेळाडूंची नावं सांगतील आणि याबरोबरच ४ पर्यायी खेळाडूंची नावंदेखील त्यांना सांगायला लागतील.
या ४ पैकी कोणत्याही एका खेळाडूला आयत्यावेळी नियमित खेळणाऱ्या ११ खेळाडूंपैकी एखाद्याच्या जागी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळायला पाठवलं जाता येईल. ज्या खेळाडूला बाहेर काढलं जाईल तो खेळाडू तो पूर्ण सामना खेळणार नाही. त्याऐवजी त्याचा पर्यायी खेळाडू सामना पूर्ण करेल. कर्णधार आणि व्यवस्थापक यांना हा निर्णय घेण्याआधी पंचांना सूचित करणं अनिवार्य असेल.
यापूर्वीही, बीसीसीआयने हा प्रयत्न केला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हा प्रयत्न केला होता, त्याला चांगले प्रोत्साहन मिळाले.
आयपीएल 2023 ची तयारी सुरू झाली आहे. बीसीसीआयकडून यावर्षी आयपीएलसाठी मिनी लिलाव आयोजित केला जाणार आहे, ज्याची तारीख 23 डिसेंबर ठेवण्यात आली आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच कोचीमध्ये लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.