IPL Auction 2023: कोण होणार मालामाल! सर्वाधिक पसंती सॅम करन, बेन स्टोक्सला ?

आयपीएलचा आज मिनी लिलाव... भारतीयांमध्ये कोणाला पसंती?
IPL Mini Auction 2023 Updates
IPL Mini Auction 2023 Updatessakal

IPL Mini Auction 2023 Updates : आयपीएलचा मिनी लिलाव आज होत आहे. एकूण १० संघ लिलावाच्या मैदानात उतरत असले, तरी काही मोजक्या जागा भरण्यासाठी कमालीची चुरस अपेक्षित आहे. ट्वेंटी-२० विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड संघातील प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स आणि सॅम करन यापैकी एकावर अधिक बोली लागण्याची शक्यता आहे.

या अगोदर २०२१ मध्येही मिनी लिलाव झाला होता त्यात दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू ख्रिस मॉरिस याला सर्वाधिक १६.२५ कोटींची लॉटरी लागली होती. त्याच्यासाठी एवढी मोठी रक्कम राजस्थान रॉयल्स संघाने मोजली होती. मॉरिस संपूर्ण क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे; मात्र उद्याच्या लिलावात सर्वाधिक बोलीचा हा विक्रम मोडला जाऊ शकतो.

कॅमेरून ग्रीनवरही लक्ष ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू

खेळाडू कॅमेरून प्रीनवरही लक्ष असेल. वर्ल्डकपपूर्वी झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत त्याला सलामीची संधी देण्यात आली होती आणि त्याने संधीचे सोने केले होते.

विल्यम्सन 'अनसोल्ड ?

आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचा कर्णधार असलेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनला संघातून दूर करण्यात आले, त्यामुळे तो उद्याच्या लिलावासाठी उपलब्ध आहे, परंतु ट्वेंटी-२० प्रकारातील त्याचा स्ट्राईक कमी असल्यामुळे त्याला कोणीही पसंती न देण्याची शक्यता अधिक आहे.

भारतीयांमध्ये कोणाला पसंती?

पंजाब संघातून रिलिज करण्यात आलेला त्यांचा माजी कर्णधार मयांक अगरवाल देशांतर्गत स्पर्धांतही प्रभाव पाडू शकलेला नाही, त्यामुळे त्याच्यासाठी कोणीही उत्सुक नसेल असे चित्र आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्माही उद्या आपले नशीब अजमावणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर कसोटी पुनरागमनाची संधी मिळालेला जयदेव उनाडकट दोन विकेट मिळवून प्रकाशझोतात आला याचा फायदा त्याला उद्या होऊ शकतो.

हैदराबादकडे सर्वाधिक रक्कम

हैदराबाद संघाने विल्यम्सन आणि पूरन यांच्यासह बहुतेक खेळाडूंना रिलिज केल्यामुळे त्यांच्याकडे उद्याच्या लिलावासाठी सर्वाधिक ४२.२५ कोटी रक्कम शिल्लक आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अधिक खरेदी अपेक्षित आहे. सर्वांत कमी रक्कम कोलकाता (७.०५ कोटी) आणि बेंगळूर (८.७५ कोटी) यांच्याकडे आहे.

करनसाठी स्पर्धा

अष्टपैलू खेळाडू आणि याअगोदरही आयपीलध्ये चेन्नई संघातून आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या सँम करनसाठी अधिक स्पर्धा असेल. तो पूर्वाश्रमीचा चेन्नईचा खेळाडू असल्यामुळे चेन्नईचे ऊंचाईस त्याला पुन्हा आपल्या संघात घेण्यास प्रयत्न करतील; मात्र सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचाईजशी त्यांना सामना करावा लागेल. करन हा केवळ २४ वर्षांचा आहे. त्याच्यासाठी भविष्यासाठीही गुंतवणूक केली जाऊ शकते. पाठीच्या दुखण्यामुळे करनने २०२२ च्या मोसमातून माघार घेतली होती. उद्याच्या लिलावासाठी त्याची पायाभूत किंमत २ कोटीची आहे.

स्टोक्सची उपलब्धता महत्त्वाची

ड्रेटी-२० विश्वकरंडक इंग्लंडला जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावणारा बेन स्टोक्सही आयपीएलमध्ये परतणार आहे. तो अगोदर राजस्थान रॉयल्सचा खेळाडू होता. तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतलेली आहे आणि ड्रेटी-२० चेसुद्धा मोजकेच सामने खेळतो, त्यामुळे उपलब्धता पाहूनच स्टोक्सवर बोली लावली जाईल. स्टोक्सचीही पायाभूत किंमत २ कोटीची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com