esakal | राहुलला 'अच्छे दिन'; मनीष पांडेलाही 11 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक बोली लागली ती लोकेश राहुल आणि मनीष पांडे या दोन खेळाडूंवर. राहुलला 11 कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाबने, तर मनीष पांडेला सन रायझर्स हैदराबादने अकराच कोटींना खरेदी केले. करुण नायर यालाही पंजाबने तब्बल 5.60 कोटी रुपये मोजून विकत घेतले. 

राहुलला 'अच्छे दिन'; मनीष पांडेलाही 11 कोटी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर - आयपीएलच्या लिलावात कधी कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावली जाईल याचा काही नेम नाही, असेच काही यंदाच्या लिलावातही पहायला मिळाले. के. एल. राहुल आणि मनीष पांडे या युवा खेळाडूंवर भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक बोली लागत तब्बल 11 कोटी रुपये मिळाले.

कायदेशीर कारवाई झालेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला याला तब्बल 12.50 कोटी रुपयांना यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या राजस्थान रॉयल्स खरेदी केले. तर, प्रमुख भारतीय खेळाडूंचाही आयपीएल लिलावात बोलबाला असल्याचे पहायला मिळाले. आश्चर्य म्हणजे, विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट, हाशिम आमला, मार्टीन गुप्टील, मुरली विजय या खेळाडूंवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.

शिखर धवन, किरॉन पोलार्ड या खेळाडूंना आपापल्या संघांनी राईट टू मॅच अंतर्गत आपल्या संघात कायम ठेवले. मात्र, त्यांना अधिक किंमत मिळाली. तर, अजिंक्य रहाणेला 4 कोटी रुपये देत राजस्थानने आपल्या संघात कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याला 9.40 कोटी रुपये देत कोलकता नाईट रायडर्सने खरेदी केली. फिरकीपटू आर. आश्विनलाही 7.40 कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केले.

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक बोली लागली ती लोकेश राहुल आणि मनीष पांडे या दोन खेळाडूंवर. राहुलला 11 कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाबने, तर मनीष पांडेला सन रायझर्स हैदराबादने अकराच कोटींना खरेदी केले. करुण नायर यालाही पंजाबने तब्बल 5.60 कोटी रुपये मोजून विकत घेतले. 

loading image
go to top