Irfan Pathan MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने इरफान पठाणचे करिअर केले उद्ध्वस्त? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irfan Pathan MS Dhoni

Irfan Pathan MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने इरफान पठाणचे करिअर केले उद्ध्वस्त?

Irfan Pathan on MS Dhoni : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहून चाहते खूप प्रभावित झाले आहेत. इरफान अवघ्या 37 वर्षांचा आहे, त्यामुळे त्याने लवकर निवृत्ती घेतल्याने चाहते प्रचंड संतापले आहेत. टीम इंडियासाठी इरफानने शेवटचा सामना ऑक्टोबर 2012 मध्ये खेळला होता. त्यावेळी धोनी संघाचा कर्णधार होता. अशा स्थितीत चाहते प्रचंड संतापले असून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर इरफानचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत आहेत.

हेही वाचा: IND Vs SA: ऋषभ पंत खेळला तर टीम इंडियाचं मोठं 'नुकसान', जाणून घ्या का?

एका चाहत्याने धोनीला शिव्या घालत ट्विट केले आणि इरफानचे करिअर बरबाद केल्याचा आरोप केला. हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. मात्र यावर इरफाननेही असे उत्तर दिले, ज्याने सर्वांची मनं जिंकले आहे. इरफानच्या या उत्तराने त्या चाहत्याच्या भावनाही दुखावल्या गेल्या नाहीत. एका चाहत्याने ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हाही मी इरफान पठाणला या लीगमध्ये पाहतो तेव्हा मी धोनी आणि त्याच्या व्यवस्थापनाला आणखी शिव्या देतो.

मला विश्वास बसत नाही की इरफानने वयाच्या 29 व्या वर्षी शेवटचा (ODI-T20) सामना खेळला होता. प्लेइंग-11 मध्‍ये नंबर-7 ही परफेक्ट पोझिशन आहे. कोणत्याही टीमला इरफानसारखा खेळाडू खेळायला आवडेल. पण टीम इंडियामध्ये रवींद्र जडेजा आणि स्टुअर्ट बिन्नी यांना त्यांच्यापेक्षा जास्त संधी देण्यात आली.

हेही वाचा: IND Vs SA: ऋषभ पंत खेळला तर टीम इंडियाचं मोठं 'नुकसान', जाणून घ्या का?

हे ट्विट सर्वाधिक व्हायरल झाले जेव्हा इरफान पठाणने त्याला उत्तर दिले. चाहत्याला उत्तर देताना इरफानने लिहिले की, यासाठी कोणाला दोष देऊ नका. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. यासोबतच इरफानने हार्ट इमोजीही बनवला आहे. इरफानच्या या उत्तराचे खूप कौतुक होत आहे.