
इशान किशनला रूग्णालयातून मिळाली सुट्टी, मात्र मेडिकल टीम....
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा सलामीवीर इशान किशनच्या (Ishan Kishan) डोक्याला चेंडू लागल्याने तो दुखपातग्रस्त (Head Injury) झाला होता. जरी त्याने यानंतर फलंदाजी केली असली तरी त्याला सामना संपल्यानंतर कांगडा येथील फोर्टिस रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. त्याचा सिटी स्कॅन (CT Scan) झाल्यानंतर त्याला रूग्णालयात काही काळ निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार इशान किशनला रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. मात्र आता तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या (BCCI Medical Team) देखरेखीखाली असणार आहे. त्यामुळे तो आजच्या तिसऱ्या टी 20 सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. (Ishan Kishan Medical Update)
हेही वाचा: Mexican Open: सलग 15 सामने जिंकणाऱ्या राफाची 91 व्या विजेतेपदाला गवसणी
श्रीलंकेच्या 184 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताचे रोहित शर्मा आणि इशान किशन हे सलामीवीर मैदानात उतरले होते. दरम्यान, लाहिरू कुमाराचा 147 किमी वेगाने टाकलेला एक बाऊन्सर (Bouncer) इशान किशनच्या थेट हेलमेटला जाऊन लागला होता. या आघातानंतर इशान किशन मैदानावरच खाली बदला. काही वेळाने तो सावरला आणि त्याने पुन्हा फलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र तो 15 चेंडूत 16 धावा करून बाद झाला.
हेही वाचा: IPL मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकणारच नाही; राज्य सरकारने घेतलेला 'हा 'निर्णय
मात्र आज सकाळी त्याला रूग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आले. त्यावेळी क्रिकेट चाहते काळजीत पडले होते. इशान किशनला त्रास होत होता म्हणून त्याला रूग्णालयात दाखल केले की खबरदारीचा उपाय म्हणून सिटी स्कॅन करण्यासाठी त्याला रूग्णालयात दाखल केले याचा माहिती मिळालेली नाही. आता त्याला रूग्णलयातून सुट्टी मिळाली असून तो आता बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असणार आहे. भारताने ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्वरित मयांक अग्रवालला (Mayank Agrawal) संघात सामील केले होते. आता इशान किशन दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी मयांक अग्रवाल रोहित बरोबर सलामी करण्याची शक्यता आहे.
Web Title: Ishan Kishan Discharged From The Hospital But Will Remain Under Observation In Bcci Medical Team
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..