
VIDEO: 'रोहित भाईबरोबर बोलणे झाले आहे, इतका सपोर्ट मिळतो तेव्हा...'
लखनौ: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) या सामन्याचा हिरो ठरला. त्याने 56 चेंडूत 89 धावांची तुफानी खेळी केली. त्याला कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) 44 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या दोघांनी 111 धावांची शतकी सलामी दिली. रोहित शर्माने इशान किशनला पूरेपूर संधी दिली. अखेर त्याने 89 धावांची खेळी करून कर्णधाराचा विश्वास सार्थ करून दाखवला. (Ishan Kishan Statement About Support From Rohit Sharma)
दरम्यान, सामना झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना इशान किशनने कर्णधार रोहित शर्माचे गुणगान गायले. इशान किशनने रोहित शर्मा त्याला कसा पाठिंबा देतो, कोणत्या टिप्स देतो याचा उलगडा इंडियन क्रिकेट टीमच्या इन्स्टाग्राम व्हिडिओत केला.
इशान किशन या व्हिडिओत म्हणतो की, 'रोहित शर्मा मला एक गोष्ट सांगत होता की मला माहिती आहे की तू पाहिजे त्यावेळी मोठे फटके खेळू शकतोस. मात्र मी गेल्या काही सामन्यात स्ट्रईक रोटेड करण्यात अपयशी ठरत होतो. येथे रोहित भाईने मला मदत केली. त्याने मला आगामी सामन्यांमध्ये एकेरी धावा कशा घेता येतील याचा नेटमध्ये सराव कर यामुळे गोलंदाजही दबावात येतात. या गोष्टीवर रोहित भाईंबरोबर बोलणे झाले आहेत.'
किशन पुढे म्हणाला की, 'इतका सपोर्ट आम्हाला मिळाल्यावर फक्त आम्हाला आता आमच्या फिटनेसकडे, खेळातील शिस्तीकडे लक्ष देणे गरजेचे असते.'
Web Title: Ishan Kishan Statement About Getting Massive Support From Rohit Sharma
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..