INDvsWI : बुमरा, शमी नाही तर 'हा' गोलंदाज मोडणार कपिल देवांचा मोठा विक्रम

वृत्तसंस्था
Saturday, 31 August 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला वबिना पार्क येथे सुरवात झाली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. 

किंग्सटन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला वबिना पार्क येथे सुरवात झाली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. 

दुसऱ्या सामन्यात जर ईशांतने 1 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो कसोटी क्रिकेमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल.

सध्या तो आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासह विभागून अव्वल क्रमांकावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ईशांत आणि कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर प्रत्येकी 155 बळी घेतले आहेत.

ईशांत शर्मा : फॅन्सी काहीच नाही पण रिझल्ट एक नंबर!

विशेष म्हणजे कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर 45 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे तर ईशांतनेसुद्धा 155 बळी मिळविण्यासाठी 45 सामने खेळले आहेत. 

कसोटी क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये माजी फिरकीपटू अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी आशिया खंडाबाहेर  200 बळी घेतले आहेत. आशियाबाहेर 200 बळी घेणारे ते एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्यांच्यापाठोपाठ कपिल देव आणि ईशांत आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये आशियाबाहेर सर्वाधिक बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज -

155 - कपिल देव (45)

155 - इशांत शर्मा (45)

147 - झहीर खान (38)

117 - जवागल श्रीनाथ (31)

98 - मोहम्मद शमी (27)

कसोटी क्रिकेटमध्ये आशियाबाहेर सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज -

200 - अनिल कुंबळे (50)

155 - कपिल देव (45)

155 - इशांत शर्मा (45)

147 - झहिर खान (38)

123 - बिशनसिंग बेदी (34)

117 - हरभजन सिंग (32)

117 - जवागल श्रीनाथ (31)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ishant Sharma Can break the record of Kapil Dev of highest wickets outside Asia