
नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल संघटना व आयोजक यांच्यामधील मास्टर राईट्स करार ॲग्रिमेंट (एमआरए) अर्थात कराराचे नूतनीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) या भारतातील मोठ्या स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात प्रश्नचिन्ह कायम आहे अन् याच कारणामुळे अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून गुरुवारी (ता. ७) महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून सुपर फुटबॉल करंडक खेळवण्यासाठी पाऊल उचलण्यात येणार आहे.