ISSF WC: शूटिंग विश्वचषक स्पर्धेत राहीची सांघिक सुवर्णपदकाला गवसणी

सुवर्णपदकासाठी अंतिम लढत भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये झाली.
राही सरनोबत
राही सरनोबतSakal

कोल्हापूर : कैरो, इजिप्त येथे सुरु असणाऱ्या आय.एस.एस.एफ. आयोजित शूटिंग विश्वचषक स्पर्धेत राही सरनोबत हिने सांघिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल, सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

सुवर्णपदकासाठी अंतिम लढत भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये झाली. अटीतटीच्या या सामन्यात भारताने घेतलेली आघाडी कमी करत सिंगापूर संघाने बरोबरी साधली. अखेर आपला खेळ सुधारत भारतीय महिला नेमबाजांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात पुन्हा आघाडी घेतली. अखेर हा सामना १७ - १३ अश्या सेटने जिंकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय संघात कोल्हापूरच्या राही सरनोबत सह सांगवान रिदम आणि ईशा सिंग यांचा समावेश होता. सिंगापूरला रौप्यपदका वर, तैवान ला कांस्य पदाकावर समाधान मानावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com