
ISSF World Cups : नेमबाजीच्या वर्ल्डकपमध्ये भारत पदक तालिकेत 'टॉप'
नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी ISSF World Cups 2022 स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारत पदक तालिकेत टॉपवर पोहचला आहे. भारताने कोरियामधील चँगवॉन येथे सुरू असलेल्या रायफल, पिस्तुल आणि शॉटगन प्रकारात आतापर्यंत 15 पदके जिंकली आहेत. यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.
हेही वाचा: World Chess Day 2022 : भारतातील गुप्त राजवट अन् बुद्धीबळ इतिहास
आज बुधवारी स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारताच्या अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि समीर यांनी रौप्य पदक जिंकले. त्यांनी हे पदक पुरूष 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल सांघिक प्रकारात जिंकले. अंतिम सामन्यात चेक रिपब्लिकने भारताचा (India) 15 - 17 अशा पराभव केला. या तिघांनी पात्रतेच्या दोन फेऱ्या पार करत अंतिम फेरीत धडक मरली होती. पहिल्या फेरीत त्यांनी 872 गुण मिळवत दुसरे तर दुसऱ्या फेरीत 578 गुण मिळवत पहिले स्थान पटकावले होते.
हेही वाचा: CWG 2022 :'मैदान बदलले, तुमची जिद्द नाही' PM मोदींच्या खेळाडूंना शुभेच्छा
अंतिम फेरीत त्यांनी धडाकेबाज सुरूवात करत 10 - 2 अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र अनुभवी चेक रिपब्लिकची मार्टिन, टॉमास, मॅटेज या तिघांनी जोरदार पुनरागमन केले. यानंतर भारतीय युवा नेमबाजांनी सामन्यावरील नियंत्रण गमावले. सामना 15-15 असा बरोबरीत आला. त्यानंतर अनुभवी चेक रिपब्लिकच्या नेमबाजांनी सामना जिंकून भारताचे अजून एक सुवर्ण जिंकण्याची संधी हिरावून घेतली.
भारताने 2019 मध्ये ISSF World Cup च्या सगळे पाच स्तर जिंकले होते. 2021 मध्ये एक आणि यंदाच्या वर्षी कैरो येथील पहिली स्टेज जिंकली आहे.
Web Title: Issf World Cups 2022 India Finished Top In Medal List
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..