'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक

'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक

MS Dhoni and Ian Bell Incident : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 2011 मध्ये नॉटिंघम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इयान बेलच्या (Ian Bell) धावबादवरुन मोठा वाद उभा राहिला होता. या सामन्यात भारतीय कर्णधार धोनीनं (MS Dhoni) इयान बेल (Ian Bell) याला वादग्रस्त धावबाद झाल्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी पाचारण केलं होतं. दहा वर्षानंतर इयान बेल यानं त्यावेळी घडलेल्या घटनेबाबत खुलासा केला आहे. एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बेल यानं स्वत:ची चूक मान्य केली. शिवाय धोनी तेव्हा पुर्णपणे निर्दोष असल्याचेही सांगितलं.

2011 मध्ये घडलेल्या घटनेवर बोलताना बेल म्हणाला की, त्यावेळी माझी चूक होती. मला पव्हेलियनकडे जाण्याची काहीही गरज नव्हती. धोनीला या घटनेमुळे ICC Spirit of Cricket Award of the Decade आवार्ड मिळाला. निश्चितच धोनी या आवार्डचा हकदार होता. या घटनेच्या दहा वर्षानंतर धोनीला आयसीसीनं Spirit Of The Game या अवार्डनं सन्मानित केलं होतं.

हेही वाचा: महेंद्रसिंग धोनी एक नाव नव्हे, युगच - शोएब अख्तर 

वाद काय होता?

जुलै 2011 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान नॉटिंघम येथे तिसरा कसोटी सामना झाला. या सामन्यात बेलच्या धावबादवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इयोन मोर्गन आणि बेल मैदानावर होते. टी ब्रेकपूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर मोर्गनने एक फटका मारला. चेंडू सिमारेषेकडे गेल्यानंतर बेल याला हा चौकार असल्याचा गैरसमज झाला. बेल क्रीज सोडून मॉर्गनसोबत बोलायला गेला. पण मॉर्गन यानं मारलेला चेंडू सिमारेषावर असणाऱ्या प्रविण कुमार यानं झेपावत अडवून थ्रो केला होता.

अभिनव मुकुंद यानं यष्ट्या उडवत धावबाद केलं. पंचांनीही बेल याला धावबाद दिला. स्टेडियममध्ये उपस्थिती असणाऱ्या प्रेक्षकांना नेमकं काय झालं हे समजले नव्हते. मात्र, भारतीय खेळाडूंची खिलाडूवृत्ती नसल्याची मानसिकाता ठेवून घोषणाबाजी केली होती. टी ब्रेकदरम्यान इंग्लंडचा कर्णधार एंड्यू स्ट्रॉस (Andrew Strauss) आणि कोच एण्डी फ्लॉवर (Andy Flower) यांनी धोनीसोबत बेल याच्या धावबादवर बातचीत केली. धोनीनं बेलविरोधीत धावबादची अपील मागे घेत पुन्हा खेळण्याची संधी दिली

Web Title: It Was A Mistake On My Behalf Should Never Do That Ian

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MS Dhoni
go to top