INDvsSA : रोहितच्या आक्रमकतेला संघाबाहेर ठेवणे अत्यंत अवघड होते : विराट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

रोहित शर्माची गुणवत्ता बघता त्याला संघाबाहेर ठेवणे कठीण होते. जागा फक्त सलामीला होती म्हणजेच रोहित शर्मा करता नव्या अध्यायाला प्रारंभ होत आहे. तो सेहवाग सारखा आक्रमक फलंदाज आहे. त्याने जम बसवला तर भारतीय फलंदाजीची धार अजून तेज होईल.

रोहित शर्माची गुणवत्ता बघता त्याला संघाबाहेर ठेवणे कठीण होते. जागा फक्त सलामीला होती म्हणजेच रोहित शर्मा करता नव्या अध्यायाला प्रारंभ होत आहे. तो सेहवाग सारखा आक्रमक फलंदाज आहे. त्याने जम बसवला तर भारतीय फलंदाजीची धार अजून तेज होईल. अश्विनला मायदेशात खेळवावेच लागेल कारण दर्जेदार गोलंदाजी बरोबर तो उत्तम फलंदाजीही करू शकतो. र्‍हीद्धीमान सहा माझ्यामते जगातील सर्वोत्कृष्ट विकेट किपर आहे. रिषभला संधी मिळाली आणि त्याने चांगला खेळ केला पण सहाला कसोटी सामन्यात संघात परत जागा देणे महत्त्वाचे आहे.

आम्हांला फक्त फिरकीला खेळताना थोडे जास्त लक्ष घालून फलंदाजी करावी लागेल. गेली जवळपास दीड वर्ष भारतीय संघ परदेशात जास्त खेळला असल्याने दर्जेदार वेगवान गोलंदाजीसमोर खेळण्याचा सराव आम्ही केला. आता मायदेशात खेळत असताना समोरच्या संघातील वेगवान गोलंदाजांसोबत फिरकीलाही आम्हांला चांगले खेळावे लागेल.

आयसीसी टेस्ट चँम्पीयनशिपमुळे प्रत्येक कसोटी सामन्याचे मोल वाढले आहे. आम्ही त्याच आव्हानाला तोंड द्यायला सज्ज झालो आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was difficult to keep rohit sharma out of team says virat kohli