
नेहराजींनी घेतली दिनेश कार्तिकची बाजू, हार्दिकला दिल्या कानपिचक्या
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात पहिला टी २० सामन्यात हार्दिक पांड्याने क्रिजवर असताना दिनेश कार्तिकबाबत घेतलेली भूमिका चांगलीच चर्चेत आली आहे. कार्तिकला स्ट्राईक न दिल्याने नेकऱ्यांनी सोशल मीडियावर पांड्याचा समाचार घेतला आहे. अशातच यावर आता गुजरात टायटन्सचे कोच आशीष नेहरा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिनेश कार्तिकची बाजू घेत हार्दिकला कानपिचक्या दिल्या आहेत.
हेही वाचा: IND vs SA दुसऱ्या टी 20 सामन्याची तिकिटे घेताना महिलांची तुंबळ हाणामारी
क्रिकबजवरील एका शोमध्ये आशीष नेहरा यांनी हार्दिकवर भाष्य केलं. 'शेवटच्या चेंडूआधी त्याने सिंगल घ्यायला हवी होती. दुसऱ्या टोकाला दिनेश कार्तिक होता, मी नाही. नेहराने मजेदार पद्धतीने हार्दिक पांड्याला मोठा धडा दिला.'
आयपीएल 2022 मध्येच अनेक सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने शेवटचा चेंडू बाऊंड्री खेळला आहे. निदाहस ट्रॉफीतील षटकार कोण विसरू शकेल असे म्हणत जो कार्तिकने शेवटच्या चेंडूवर मारून टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होत याची आठवण करुन दिली.
तसेच, नेहराने पांड्याचे कौतुकदेखील केले. पांड्या एक अशी व्यक्ती आहे, जो प्रत्येक भूमिकेची जबाबदारी घेऊ शकतो. त्याने प्रत्येक प्रकारामध्ये फलंदाजी केली आहे. टेस्ट वनडे मध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. तो त्याच्या क्षमतेवर कोणत्याही स्थानी फलंदाजी करु शकतो. मग तो नंबर ३ किंवा ४ असो.
तो यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार होता. त्याने गोलंदाजीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. अशा शब्दात नेहरा यांनी पांड्याचे कौतुक केले आहे.
हेही वाचा: पांड्याने भावाचा घेतला बदला; 3 वर्षापूर्वी डिके न काय केलं होत?
साऊथ अफ्रिकेविरुद्ध सामन्यात नेमकं काय घडलं?
20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार ऋषभ पंत बाद झाल्यानंतर कार्तिक क्रिजवर आला. पुढील चेंडू नॉर्टजेने कार्तिकला टाकला, त्यानंतर डीके त्यावर धावा करू शकला नाही. तिसर्या चेंडूवर कार्तिकने हार्दिक पांड्याला एक धाव घेऊन स्ट्राइक दिली, पण यादरम्यान तो धावबाद होण्यापासून बचावला.
फिल्डींग थ्रो स्टंपला लागला असता तर डीके आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला असता. चौथ्या चेंडूवर पांड्याने षटकार मारला, पण पुढच्या चेंडूवर त्याने डीप मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला, धाव घेण्याची संधी होती, पण पांड्याने धाव घेण्यास नकार दिला. पांड्याने डीकेला स्ट्राइक दिली नाही आणि स्वतः सामना संपवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेत त्याने संघाची धावसंख्या 211 धावांवर नेली.
या सामन्यात डीके केवळ २ चेंडूवर एक रन करु शकला.
Web Title: It Wasnt Me At The Other End Ashish Nehra On Hardik Pandyas Refusal To Given Dinesh Karthik The Strike
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..