
मेलबर्न : इटलीचा २२ वर्षीय टेनिसपटू यानिक सिनर याने रविवारी इतिहास रचला. चौथ्या मानांकित सिनर याने अजिंक्यपदाच्या लढतीत तिसरा मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याच्यावर ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असा पाच सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवला आणि पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम विजेता होण्याचा मान संपादन केला.
सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम जिंकताना धडाकेबाज कामगिरी केली. इटलीच्या पुरुष टेनिसपटूने ग्रँडस्लॅम जिंकण्याची ही ४८ वर्षांतील पहिलीच खेप ठरली. याआधी १९७६ मध्ये ॲड्रियानो पनाटा याने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता सिनर याने बाजी मारली आहे.
रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याने अजिंक्यपदाच्या लढतीत पहिल्या दोन सेटमध्ये ६-३, ६-३ असे यश मिळवले. ही लढत मेदवेदेव सहज जिंकेल असे वाटत असतानाच यानिक सिनर याने झोकात पुनरागमन केले. पुढील तीन सेटमध्ये त्याने ६-४, ६-४, ६-३ असे वर्चस्व राखताना मेदवेदेवला पराभूत केले. सिनर याने ही लढत तीन तास व ४४ मिनिटांमध्ये जिंकली.
निकोला पिट्रॅंगेली (पुरूष, फ्रेंच ओपन १९५९, १९६०)
ॲड्रियानो पनाटा (पुरुष, फ्रेंच ओपन १९७६)
यानिक सिनर (पुरुष, ऑस्ट्रेलियन ओपन २०२४)
फ्रान्सिस्का शियावोन (महिला, फ्रेंच ओपन २०१०)
फ्लॅविया पेनेटा (महिला, अमेरिकन ओपन, २०१५)
यानिक सिनरच्या इटलीने गेल्या वर्षी डेव्हिस चषक पटकावला होता. १९७६ नंतर त्यांना अशी कामगिरी करता आली होती.
यानिक सिनर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला व जेतेपद पटकावले.
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकणारा यानिक सिनर हा पहिलाच इटलीचा टेनिसपटू ठरला.
ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारा यानिक सिनर हा इटलीचा पाचवा खेळाडू ठरला आहे.
याआधी इटलीच्या तीन पुरुष व दोन महिला खेळाडूंनी ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.