

Youth Ploughs Cricket Pitch with Tractor After Selection Snub, Match Abandoned
esakal
भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून भावना आहे. गावातील शेतापासून शहरातील गल्ल्यांपर्यंत सर्वत्र हा खेळ खेळला जातो. मात्र, या खेळात भांडण विकोपाला जाऊन हिंसक रूप धारण करतात, याची अनेक उदाहरणे आहेत. यावेळी मात्र एक अतिशय धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एका तरुणाने संपूर्ण खेळपट्टी ट्रक्टरने नांगरून काढली.