India Vs England 2nd Test : इंग्लंडच्या Playing 11 ची झाली घोषणा, 690 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची झाली एन्ट्री

India Vs England Playing 11 : वीस वर्षाचा शोएब बशीर देखील करणार कसोटी पदार्पण
ind vs eng
ind vs eng esakal

India Vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आज आपल्या प्लेईंग 11 ची घोषणा केली. त्यांनी पहिल्या कसोटीतील संघात दोन बदल केले असून इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन संघात परतला असून शोएब बशीरला देखील कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे.

ind vs eng
IND vs ENG Mohammed Shami : ज्यावेळी दोन्ही एन्डकडून दबाव असतो... टीम इंडिया शमीला जास्तच मिस करतेय?

इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आज आपल्या संघाची घोषणा केली. सामना उद्या विशाखापट्टणमच्या विझॅक स्टेडियमवर होत आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. दुखापतग्रस्त जॅक लीचच्या ऐवजी इंग्लंडचा युवा फिरकीपटू शोएब बशीरचा समावेश केला आहे. तो व्हिसा प्रक्रियेत गोंधळ झाल्याने पहिल्या कसोटीपूर्वी भारतात येऊ शकला नव्हता.

इंग्लंडने आपल्या संघात अजून एक बदल केला असून पहिल्या कसोटीतील एकमेव वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या ऐवजी अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला आहे.

इंग्लंडची प्लेईंग 11 :

1. झॅक क्राऊली

2. बेन डकेट

3. ली पोप

4. जो रूट

5. जॉनी बेअरस्टो

6. बेन स्टोक्स

7. बेन फोक्स

8. रेहान अहमद

9. टॉम हार्टली

10. शोएब बशीर

11. जेम्स अँडरसन

ind vs eng
Nigerian Chess Player : नायजेरियन बुद्धीबळपटूने एकाचवेळी 10 खेळाडूंना हरवलं; Video होतोय तुफान व्हायरल

बेन स्टोक्सने यापूर्वी सर्व फिरकी गोलंदाज घेऊन खेळण्याचे संकेत दिले होते. मात्र विशाखापट्टणममध्ये तर स्टोक्स असं काही करताना दिसत नाहीये. विझॅकवरील खेळपट्टीवर पहिल्या दिवशी चांगल्या धावा होतात.

इंग्लंडने तीन फिरकीपटूंसोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जेम्स अँडरसन हा भारतात आपली 14 वी कसोटी खेळणार आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने मार्क वूड हा एकमेव वेगवान गोलंदाज खेळवला होता.

मात्र दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्स हा गोलंदाजी करणार आहे. त्यामुळे इंग्लंडकडे पाच गोलंदाज होत आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com