Jannik Sinner
sakal
लंडन - फ्रेंच ओपन या मागील टेनिस ग्रँडस्लॅममध्ये दुसऱ्या फेरीत पराभूत झालेल्या यानिक सिनर या इटलीच्या अव्वल मानांकित टेनिसपटूला विम्बल्डन या मानाच्या स्पर्धेतही पुरुष एकेरीमध्ये पहिल्याच फेरीत विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली. गतविजेत्या यानिक सिनर याने पाच सेटच्या झुंजीनंतर सर्बीयाच्या मिओमीर केकमॅनोविच याच्यावर विजय साकारला. यानिक सिनर याने ४-६, ६-३, ६-७, ६-२, ६-३ असा तीन तास व ३० मिनिटांमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली.