WI vs ENG: होल्डरचा विक्रमी चौका; 4 चेंडूत 4 विकेट्स (VIDEO) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 jason holder

WI vs ENG: होल्डरचा विक्रमी चौका; 4 चेंडूत 4 विकेट्स (VIDEO)

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू जेसन होल्डर (Jason Holder) ने रविवारी झालेल्या सामन्यात नवा इतिहास रचलाय. बारबाडोसच्या मैदानात इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात त्याने हॅटट्रिक घेतली. टी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा होल्डर हा वेस्ट इंडीजचा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने 4 चेंडूत 4 विकेट घेतल्या. त्याच्या भेदक माऱ्यासमोर गडबडलेल्या इंग्लंडला या सामन्यात 17 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यासह वेस्ट इंडीजने ही मालिका 3-2 अशी खिशात घातली. 30 वर्षीय होल्डरनं टी-20 तील सर्वोच्च कामगिरीसह 4 षटकात 27 धावा खर्च करुन 5 विकेट घेतल्या.

कॅरेबियन (West Indies) ऑलराउंडर जेसन होल्डरने (jason holder) क्रिस जॉर्डन (7), आदिल राशिद (0) आणि शाकिब महमूद (0) यांची विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण केली. त्याशिवाय त्याने सॅम बिलिंग्स (41) आणि कर्णधार मोईन अली (14) ला देखील तंबूचा रस्ता दाखवला, त्याने आपली हॅटट्रिक अखेरच्या षटकात पूर्ण केली.

हेही वाचा: Australian Open: पराभवालाही 'पराभूत' करत नदालने इतिहास रचला

आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात 4 चेंडूत 4 विकेट घेणारा होल्डर आता चौथा गोलंदाज ठरलाय, याआधी अफगानिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान, श्रीलंकाचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा आणि आयर्लंडच्या कुर्टिस कॅम्परने चार चेंडूत चार विकेट घेण्याचा पराक्रमक केला होता. कॉम्परनं टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत चार चेंडूत 4 विकेट घेतल्या होत्या.

हेही वाचा: BBLविजेतेपदाचे 'रक्ताने माखलेले' सेलिब्रेशन;पाहा व्हिडीओ

वेस्ट इंडीजने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 179 धावा केल्या होत्या. कर्णधार पोलार्डनं 25 चेंडूत नाबाद 41 धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूला रावमन पॉवेल यानं 17 चेंडूत नाबाद 35 धावांची खेळी केली. वेस्ट इंडीजने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना जेम्स विन्सनं 35 चेंडूत 55 धावांची खेळी केली. सॅम बिलिंग्जनं 28 चेंडूत 41 धावा केल्या. पण त्यांची ही खेळी संघाला विजय मिळवून दण्यात पुरेशी ठरली नाही. इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडणाऱ्या जेसन होल्डरला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिजनं गौरवण्यात आलं.

Web Title: Jason Holder Becomes First West Indies Bowler To Take A Hat Trick In T20is

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top