IND vs WI: वेस्ट इंडिजला पराभवानंतर मोठा धक्का, Jason Holder मालिके बाहेर

वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू जेसन होल्डर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही खेळला नव्हता
Jason Holder
Jason Holdersakal

Jason Holder Covid-19 : भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर वेस्ट इंडिज संघाला आणखी एक धक्का बसला आहे. कोरोनाबाधित संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर संपूर्ण मालिकेसाठी बाहेर आहे. मालिकेत आधीच 0-1 ने पिछाडीवर असलेल्या यजमान संघाच्या अडचणी आता वाढल्या आहेत. मात्र, आता त्याच्या पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

होल्डरची मालिकेतून बाहेर पडणे ही टीम इंडियासाठी दिलासा देणारी बातमी आहे. होल्डरने भारताविरुद्ध खेळलेल्या 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 450 धावा केल्या आहेत आणि 23 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजला त्याची उणीव भासली होती. भारताविरुद्ध होल्डरने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा वनडे खेळला होता. तेव्हापासून तो एकदिवसीय संघाबाहेर होता. होल्डर 6 महिन्यांनी परतणार होता पण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला अजून काही काळ थांबावे लागेल.

पहिल्या वनडेच्या नाणेफेकीदरम्यान वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की जेसन होल्डर कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याला उर्वरित संघापासून वेगळे ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com