जेसन होल्डर ठरला विंडीज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

गयाना : विंडीजचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार जेसन होल्डर याला क्रिकेट वेस्ट इंडिज टेस्ट प्लेअर ऑफ दी ईअर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मागील वर्षात केलेल्या चमकदार अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याने 2018मध्ये विंडीजकडून खेळताना 336 धावा केल्या तसेच 33 बळी मिळविले. 

या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली विंडीज संघाने बलाढ्य इंग्लंडला पराभूत केले. तसेच जानेवारीमध्ये त्याने आयसीसी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये विंडीजच्या माजी क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांना मागे टाकले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jason Holder Named Cricket West Indies Test Player Of The Year