ENG vs IND : जसप्रीत बुमराहने इंग्लंड दौऱ्यावर केले मोठे रेकॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah Became Most Wicket Taker For India In England 5 Test Match Tour

ENG vs IND : जसप्रीत बुमराहने इंग्लंड दौऱ्यावर केले मोठे रेकॉर्ड

बर्मिंगहम : भारताचा काळजीवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंड दौऱ्यावर एक मोठा कारनामा केला. त्याने गतवर्षीच्या दौऱ्यातील स्थगित झालेल्या पाचव्या कसोटीत पहिल्या डावात 3 विकेट घेत भुवनेश्वर कुमारचे रेकॉर्ड (Cricket Record) मोडले. गतवर्षी कोरोनामुळे पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली. ही कसोटी 1 जुलैपासून सुरू झाली.

हेही वाचा: ENG vs IND : टी-20 सामन्यात द्रविड ऐवजी लक्ष्मणच असणार मुख्य प्रशिक्षक

जसप्रीत बुमराहने भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे (Bhuvneshwar Kumar) 2014 मध्ये केलेले रेकॉर्ड मोडले. त्याने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 21 विकेट घेतल्या. यापूर्वी भुवनेश्वरने 2014 ला 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 19 विकेट घेतल्या होत्या. रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा खांद्यावर घेणाऱ्या जसप्रीत बुमराहकडे आपले हे रेकॉर्ड अजून पुढे नेण्याची संधी आहे.

भारताकडून इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या पाच जणांच्या यादीत फक्त एका फिरकीपटूचा समावेश आहे. या यादीत लेग स्पिनर सुभाष गुप्ते (Subhash Gupte) यांनी 1959 मधील दौऱ्यात 5 सामन्यात 17 विकेट घेतल्या. त्यांनी 34.64 च्या सरासरीने विकेट घेतल्या. तर 2.94 प्रती षटके अशा सरासरीने धावा दिल्या.

हेही वाचा: Video: पंतने दिले जडेजाला शतकाचे श्रेय, तो होता म्हणून...

इंग्लंड दौऱ्यावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांची भारतीय गोलंदाजांची यादी (5 कसोटी सामने)

(Most Wicket Taker For India In England 5 Test Match Tour)

  • जसप्रीत बुमराह / 2021-22 सामने / 5 विकेट - 21/ विकेट सरासरी 21.09 धावांची सरासरी 2.60

  • भुवनेश्वर कुमार / 2104 सामने 5 / विकेट - 19 / विकेट सरासरी 26.36 / धावांची सरासरी 2.92

  • जहीर खान / 2007 सामने 5 / विकेट - 18 / विकेट सरासरी 20.33 / धावांची सरासरी 2.68

  • इशांत शर्मा / 2018 सामने 5 / विकेट - 18 / विकेट सरासरी 24.27 / धावांची सरासरी 2.89

  • सुभाष गुप्ते / 1959 सामने 5 / विकेट - 17 / विकेट सरासरी 34.64 / धावांची सरासरी 2.94

Web Title: Jasprit Bumrah Became Most Wicket Taker For India In England 5 Test Match Tour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top