World Cup 2019 : फास्ट बुमराच्या अतिफास्ट विकेट्स; घेतले 100 बळी

वृत्तसंस्था
Saturday, 6 July 2019

भारतासाठी सर्वांत वेगवान 100 बळी घेणारे गोलंदाज

महंमद शमी : 56 सामने
जसप्रित बुमरा : 57 सामने
इरफान पठाण : 59 सामने
झहीर खान : 65 सामने

वर्ल्ड कप 2019 : लीड्स : भारताचा डेथ स्पेशलिस्ट जसप्रित बुमरा याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा पार केला आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने दिमुथ करुणारत्नेला बाद करुन 100 बळी टिपण्याचा विक्रम केला. त्याने 57 सामन्यांमध्ये हा विक्रम केला असून भारताकडून अशा कामगिरी करणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला आहे. 

भारतासाठी सर्वांत वेगवान 100 बळी घेणारे गोलंदाज-
महंमद शमी : 56 सामने
जसप्रित बुमरा : 57 सामने
इरफान पठाण : 59 सामने
झहीर खान : 65 सामने


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jasprit bumrah takes 100 wickets in ODI