INDvsSA : भारताला मोठा धक्का! बुमरा संघाबाहेर, कसोटीत 'या' गोलंदाजाचे पुनरागमन

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जसप्रित बुमराला संघातून वगळ्यात आले आहे.  त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे.

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जसप्रित बुमराला संघातून वगळ्यात आले आहे.  त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे.

सुपर ओव्हर टाय झाल्यास आता.. नियमात झाला हा मोठा बदल!

बुमराच्या पाठीला छोटेसे फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.  तंदुरुस्तीची चाचणी होत असताना त्याची दुखापत निदर्शनास आली. आता त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळूर येथे रवाना केले जाणार आहे. तिथे त्याच्यावर उपचार केले जातील. 

त्याच्या जागी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. भारत आणि दक्षिण यांच्यात तीन कसोटी सामने होणार आहे. यातील पहिला सामना दोन ऑक्टोबरला सुरु होणार आहे तर अखेरचा सामना 19 ऑक्टोबरला होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah was replaced by Umesh Yadav in test team against South Africa