Swami Samarth Kabaddi tournament Prabhadevi match results
esakal
Swami Samarth Kabaddi tournament Prabhadevi match results रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरु असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसर्या दिवशीही कबड्डीप्रेमी थराराची मेजवानी चाखायला मिळाली. चढाई-पकडींच्या द्वंद्वात वाघजाई-शिवनेरी आणि मिडलाईन-नवोदित यांच्यातील लढती शेवटच्या चढाईत बरोबरीत सुटल्या तर काही लढती गटात पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवण्यासाठी फिक्स असल्यासारख्या खेळल्या गेल्या. शिवनेरी सेवा मंडळ १०-२९ असा पिछाडीवर असताना जतिन विंदेने केलेल्या तूफानी चढायांनी वाघजाई क्रीडा मंडळाला नामोहरम करत सामना नाट्यमयरित्या ३९-३९ असा बरोबरीत सोडवला. दुसर्या दिवसाच्या संघर्षात वाघजाई, विजय क्लब, गोल्फादेवी या संघांनी विजयाची नोंद करत बाद फेरीच्या दिशेने कूच केली आहे.