esakal | निवड व्हायची तेव्हा होईल परंतु... - उनाडकट
sakal

बोलून बातमी शोधा

निवड व्हायची तेव्हा होईल परंतु... - उनाडकट

निवड व्हायची तेव्हा होईल परंतु... - उनाडकट

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राजकोट : ‘निवडसमितीकडून संघात निवड का झाली नाही याचा पश्चात्ताप न करत बसता ज्या खेळाने खूप काही दिलं तो खेळणे कधीही सोडणार नाही. अशा शब्दांत डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकटने आपल्या भावना व्यक्त करत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. इंग्लंड पाठोपाठ श्रीलंका दौऱ्यासाठीही भारतीय संघात निवड न झाल्याने ट्विटरच्या माध्यमातून उनाडकटने स्वतःच्या भावनांना वाट काढून दिली.

पुढे बोलताना तो म्हणाला की, 'अगदी लहान वयापासूनच क्रिकेटची आवड माझ्यात जडली व मैदानात खेळणाऱ्या अनेक दिग्गज खेळाडूंकडून मला याची प्रेरणा मिळत गेली. नंतर इतक्या वर्षांनंतर त्या सर्व गोष्टींचा अनुभवही मी घेतला. या प्रवासादरम्यान अनेकांनी मला अपरिपक्व, चिडचिडा गोलंदाज, गावाकडचा खेळाडू असे म्हणून हिणवले परंतु,नंतर त्यांचा हा समज मी बदलला.मी परिपक्व झालो. यात अनेकदा चढ उतारही अनुभवले,पण क्रिकेटशिवाय मी काय असतो?'

२०२० च्या रणजी करंडक स्पर्धेत २९वर्षीय उनाडकटने ६७ फलंदाज बाद करत विक्रम रचला व सौराष्ट्राला विजय मिळवून दिला होता. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केलेला पोरबंदरच्या उनाडकट राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलही खेळला आहे. तसेच त्याने आजवर एक कसोटी, सात एकदिवसीय व १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

loading image