जयंत, नवदीप भारताच्या ‘वन डे’ संघात | Jayant Yadav Navdeep Saini included in ODI team | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Yadav Navdeep Saini included in ODI team
जयंत, नवदीप भारताच्या ‘वन डे’ संघात

जयंत, नवदीप भारताच्या ‘वन डे’ संघात

मुंबई : अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेतील (India ODI Team For South Africa Tour) वन डे मालिकेत खेळता येणार नाही. निवड समितीकडून जयंत यादव (Jayant Yadav) याला वन डे मालिकेसाठी तेथेच थांबायला सांगण्यात आले आहे. कसोटी संघात असलेला जयंत यादव भारतीय संघासोबत आहे. तसेच मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा दुखापतीमधून अजूनही पूर्णपणे बरा झाला नसल्यामुळे त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची (Navdeep Saini) निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: अ‍ॅशेस हरली इंग्लंड शिक्षा मात्र राजस्थान रॉयल्सला?

रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारताच्या वन डे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत के. एल. राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. जसप्रीत बुमराहची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण; आफ्रिका दौऱ्याला मुकणार?

भारताचा (Team India) वन डे संघ - के. एल. राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकेटश अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्‍विन, भुवनेश्‍वरकुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top