Jhulan Goswami : अलविदा झूलन! भारतीय संघाने इंग्लंडचा केला सूपडा साफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jhulan Goswami

Jhulan Goswami : अलविदा झूलन! भारतीय संघाने इंग्लंडचा केला सूपडा साफ

Jhulan Goswami : भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा पराभव केला. शनिवारी लॉर्ड्सवर झालेल्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना टीम इंडियाने 16 धावांनी जिंकला. भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या टीमने इंग्रजांना हरवून झुलनला एक अप्रतिम भेट दिली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघ 45.4 षटकात सर्वबाद 169 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने 43.3 षटकात 153 धावा केल्या. झुलनला शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला होता. याशिवाय नाणेफेकसाठी हरमनप्रीत कौर तिला सोबत घेऊन गेली.

झुलनने शेवटच्या सामन्यात घेतल्या दोन विकेट

झुलन शेवटच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर खाते न उघडताच बाद झाली. त्याचबरोबर गोलंदाजीत 10 षटकात 30 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. झुलनने वनडे कारकिर्दीत 255 विकेट घेतल्या आहे. त्याच्या नावावर कसोटीत 44 आणि टी-20मध्ये 56 विकेट आहेत. अशा प्रकारे झुलनने एकूण 284 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 355 विकेट्स घेत आपल्या कारकिर्दीचा शेवट केला.