
मी कुटुंबासोबत असणं गरजेचं होतं पण...रूटने मनातील सल बोलून दाखवली
लंडन : इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूटने (Joe Root) न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करत शतक ठोकले. लॉर्ड्समध्ये खेळला गेलेला पहिला कसोटी सामना इंग्लंडने 5 विकेट राखून जिंकला. यात जो रूटने मोलाचे योगदान दिले. या विजयाबरोबरच तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. जो रूटने या कसोटीत पहिल्या डावात 11 तर दुसऱ्या डावात नाबाद 115 धावा केल्या.
हेही वाचा: बीडच्या अविनाशने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडला
दरम्यान, कसोटी संघाचे नेतृत्व (Test Captaincy) सोडल्यानंतर पहल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळालेला जो रूट आपल्या कॅप्टन्सीबाबत म्हणाला की, 'प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर कॅप्टन्सी आणि माझ्यामधले जे नाते होते ते खूप खराब झाले होते. कसोटी संघाचे नेतृत्व करत असताना त्याचा माझ्या आरोग्यावर विपरित परिणाम होत होता. मी मैदानावरील दबाव (Pressure) आणि जबाबदाऱ्या मैदानावरच सोडून येऊ शकत नव्हतो.'
'मी सामान्य जीवन जगू शकत नव्हतो. घरात देखील या गोष्टी माझी पाठ सोडत नव्हत्या. कॅप्टन्सी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे माझ्या डोक्यात कायम घर करून असायचे. ही गोष्ट माझ्या कुटुंबियांसाठी (Family) आणि जवळच्या लोकांसाठी योग्य नव्हत्या. या माझ्यासाठी देखील योग्य नव्हत्या. मला घरात फक्त माझ्या कुटुंबासोबत असणे गरजेचे होते. मात्र असे होत नव्हते.'
हेही वाचा: उमरान मलिक शोएबचा विक्रम मोडण्याबाबत म्हणाला..
जो रूट पुढे म्हणाला की, 'इंग्लंडचे नेतृत्व करताना मी माझं सर्वस्व पणाला लावलं. माझा एकच उद्येश होता संघाने प्रगती करावी. त्यानंतर माला जाणवले की संघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी वेगळ्या गोष्टींची गरज आहे. मी एक फलंदाज म्हणून माझ्या संघाला अव्वल स्थानावर पोहचवू शकतो. या कामात मी बेन स्टोक्सला शक्य तेवढी मदत करणार आहे. मी यासाठी खूप उत्साही आहे.'
न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात 132 आणि दुसऱ्या डावात 285 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात 141 आणि 279 धावा केल्या होत्या. जेम्स अँडरसन आणि मॅटी पॉट्सने प्रत्येकी 6 आणि 7 विकेट घेतल्या. तर स्टुअर्ट ब्रॉडने 4 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडकडून टीम साऊदी (4), ट्रेंट बोल्ट (4) आणि काईल जेमिसन(6) यांनी देखील भेदक मारा केला होता. फलंदाजीत डॅरेल मिचेल आणि जो रूट या दोघांनी शतकी खेळी केली.
Web Title: Joe Root Statement About Test Captaincy Pressure And Family Life After Eng Vs Nz First Test
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..