Jonny Bairstow ला 'बाहुबली' होणे पडले महागात, टी-20 सीरीजमधून डच्चू? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jonny Bairstow

Jonny Bairstow ला 'बाहुबली' होणे पडले महागात, टी-20 सीरीजमधून डच्चू?

Jonny Bairstow ENG vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे. जॉनी बेअरस्टोला त्याचा सहकारी सॅम कॅरेनला खांद्यावर घेऊन जाणे महागात पडले आहे. बेअरस्टोला सराव सत्र मध्येच सोडावे लागले. त्यानंतर त्याच्या डाव्या गुडघ्यावर पट्टी बांधली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील खेळण्याबाबत शंका आहे. इंग्लंडच्या बार्मी आर्मीने तिच्या हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

बेअरस्टोने गेल्या आठवड्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळणे सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. मंगळवारी त्याने ब्रिस्टल स्टेडियममधील सराव सत्र मधूनच सोडून गेला. त्याच्या डाव्या गुडघ्यावर पट्टी बांधली होती आणि आईस पॅक देखील लावला होता. तो मैदानात परतणार की नाही, हे अद्याप माहिती नाही, पण यामुळे सलामीवीराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Jonny Bairstow Can Be Ruled Out Of T20 Series Against South Africa Sam Curran Cost Expensive For Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..