Paralympic 2024 Rudransh Khandelwal: आठव्या वर्षी गमावला पाय, पण भारताचा १७ वर्षीय नेमबाज सुवर्ण'वेध' घेण्यासाठी सज्ज

Paris 2024 Rudransh Khandelwal: वयाच्या आठव्या वर्षी अपघातामुळे रुद्रांशचा पाय कापावा लागला. पण, त्याने न खचता स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवला.
rudransh khandelwal
rudransh khandelwalesakal
Updated on

Rudransh Khandelwal in Paris Paralympic 2024:

भारताचे ८४ खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि त्यामध्ये १७ वर्षाच्या नेमबाजावर सर्वांचे लक्ष असणार आहे. भारतीय ताफ्यातील युवा खेळाडूंपैकी तो एक आहे आणि नेमबाजीत सुवर्ण 'लक्ष्य' भेदण्याचा त्याचा निर्धार आहे. भारताच्या अन्य खेळाडूंप्रमाणेच या युवा नेमबाजाचा संघर्ष प्रेरणादायी आहे. राजस्थानच्या भरतपूर येथील रुद्रांश खंडेलवाल प्रथमच पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे आणि पहिल्याच प्रयत्नात पदक जिंकण्याचा त्याचा निर्धार आहे...

कृत्रिम पायावर जिद्दीने उभा...

वयाच्या आठव्या वर्षी अपघातामुळे रुद्रांशचा पाय कापावा लागला. पण, त्याने न खचता स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवला आणि तो पॅरिसमध्ये भारतीय ताफ्यासोबत पदक जिंकण्यासाठी दाखल झाला आहे. २०१५ साली चुलत बहिणीच्या लग्नात फटाक्यांची आतशबाजी पाहताना शॉर्ट-सर्किट झाला आणि उडालेली एक धातूची प्लेट रुद्रांशच्या पायात घुसली. ज्यामुळे त्याचा पाय कापावा लागला आणि रुद्रांशला कृत्रिम पाय लावावा लागला.

rudransh khandelwal
Paralympic 2024: जन्मत:च दोन्ही हात नव्हते, पण पायाच्या ताकदीवर शितलने परिस्थितीला हरवलं; ती आहे आजच्या युगाची 'अर्जुन'!

मनू भाकरच्या 'त्या' प्रसंगातून घेतला धडा...

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पिस्तुलमधील खराबीमुळे मनू भाकरचे पदक थोडक्यात हुकले होते. ही गोष्ट रुद्रांशने लक्षात ठेवली होती आणि त्यामुळेच तो पॅरालिम्पिकमध्ये अतिरिक्त पिस्तुल घेऊन पोहोचला आहे. रुद्रांश राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येही अतिरिक्त पिस्तुल स्वतःजवळ ठेवतो.

परिस्थिती गंभीर, मी खंबीर...

रुद्रांश सांगतो की,''कोणत्याही परिस्थितीसाठी आपण तयार राहिले पाहिजे आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला पाहिजे. त्या अपघातानंतर सहा महिन्यात परिस्थिती सुधारली होती, परंतु आई चिंतेत होती. मी नैराश्याच्या गर्तेत सापडेन की काय, अशी भिती तिला होती.''

rudransh khandelwal
Paralympic 2024: अपघात, नैराश्य अन् मिळाला खेळाचा आधार; नांदेडच्या भाग्यश्री जाधवचा संघर्ष

आईची आयडिया अन्...

रुद्रांशची आई भरतपूर विश्वविद्यालयामध्ये शिक्षिका आहे. त्यामुळे तिने रुद्रांशला कामामध्ये व्यस्त ठेवण्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली. रुद्रांशला नैराश्यापासून दूर ठेवण्यासाठी खेळ हा उत्तम पर्याय आहे, असे त्यांना वाटले. म्हणूनच त्यांनी रुद्रांशचा नेमबाजीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि कोच सुमित राठी यांच्या मदतीने रुद्रांशने नेमबाजीची सुरुवात केली आणि इथपर्यंत पोहोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com