पुन्हा उपविजेतेपद टाळल्याचा आनंद : सिंधू

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

ती 2017 मध्ये ओकुहाराविरुद्ध, तर 2018 मध्ये कॅरोलीन मरिनविरुद्ध पराजित झाली होती. त्यामुळे सिंधूला हे विजेतेपद जास्त मोलाचे होते.

बासेल/मुंबई : ''गतस्पर्धेत उपविजेती होते, त्यापूर्वीच्या स्पर्धेतही उपविजेतीच होते. यंदा हे टाळायचे होते. त्यामुळे हे विजेतेपद खूप मोलाचे आहे,'' अशी भावना जगज्जेती पी. व्ही. सिंधूने व्यक्त केली. 

सिंधूला गेल्या दोन जागतिक स्पर्धांत अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. ती 2017 मध्ये ओकुहाराविरुद्ध, तर 2018 मध्ये कॅरोलीन मरिनविरुद्ध पराजित झाली होती. त्यामुळे सिंधूला हे विजेतेपद जास्त मोलाचे होते. हे विजेतेपद मी देशासाठी जिंकले आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. त्यामुळे या विजेतेपदाचा आनंद वाढला आहे, असे सामना संपल्यानंतर सांगितले. 

यापूर्वीच्या दोन अंतिम लढती बघता या वेळी आत्मविश्‍वासाच्या आघाडीवर सिंधू एक पाऊल पुढे होती. गेल्या दोन स्पर्धेत ती दमली होती. या वेळची सिंधू वेगळी होती. ती वेगळ्या नियोजनाने लढतीत उतरली आणि तिने ते एकतर्फी विजयाने दाखवून दिले. 
- पी. गोपीचंद, बॅडमिंटन प्रशिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The joy of avoiding runners up again in same tournament says Sindhu