बजरंग, साक्षी, विनेशपासून कुस्तीला वाचवा ; ज्युनियर खेळाडूंचे नवी दिल्लीत आंदोलन; एक वर्ष वाया गेल्याचा आरोप

भारतीय कुस्ती संघटनेवरील निलंबन १० दिवसांत मागे घेतले नाही, तर आम्हाला मिळालेली पदके परत करू, असे ज्युनियर कुस्तीपटूंकडून सांगण्यात आले आहे.
बजरंग, साक्षी, विनेशपासून कुस्तीला वाचवा ; ज्युनियर खेळाडूंचे नवी दिल्लीत आंदोलन; एक वर्ष वाया गेल्याचा आरोप

नवी दिल्ली : भारतातील कुस्ती या खेळाशी संबंधित वाद मिटता मिटेना. ब्रिजभूषण शरण सिंहचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी निवडीला विरोध करत नव्या कार्यकारिणीवर टीका केली. त्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कार्यकारिणीला निलंबित करण्यात आले; मात्र ज्युनियर कुस्तीपटूंनी बुधवारी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे जोरदार आंदोलन करत बजरंग, साक्षी व विनेश यांच्यावर एक वर्ष वाया गेल्याचा आरोप केला. तसेच साक्षी, बजरंग, विनेश या तीन खेळाडूंपासून भारतीय कुस्तीला वाचवा, अशी विनंती जागतिक कुस्ती संघटनेकडे करतानाच भारतीय कुस्ती संघटनेवरील निलंबन हटवा, अशी मागणी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे केली.

उत्तर प्रदेश, हरियाना व दिल्ली येथील ज्युनियर कुस्तीपटू बसमधून नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे दाखल झाले. बागपथमधील आर्य समाज आखाडा व नरेला येथील वीरेंद्र कुस्ती अकादमी येथील कुस्तीपटूंनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. कडाक्याच्या थंडीत त्यांनी सकाळी ११ वाजता तेथे पाऊल ठेवले. तसेच तब्बल तीन तास आंदोलन करताना आपली मागणी सर्वांसमोर आणली. भारतीय कुस्ती संघटनेवरील निलंबन १० दिवसांत मागे घेतले नाही, तर आम्हाला मिळालेली पदके परत करू, असे ज्युनियर कुस्तीपटूंकडून सांगण्यात आले आहे.

लाखो कुस्तीपटूंची कारकीर्द पणाला

प्रशिक्षक प्रदीपकुमार यांनी परखड मत व्यक्त करताना म्हटले, की उत्तर प्रदेशमधील ९० टक्केपेक्षा जास्त आखाडे आमच्या बाजूने आहेत. लाखो ज्युनियर कुस्तीपटू एका बाजूला आहेत आणि साक्षी, बजरंग व विनेश हे तीन कुस्तीपटू एका बाजूला आहेत. या तीनही कुस्तीपटूंना पदकांचे मोलही नाही. त्यांनी पदके चक्क रस्त्यावर ठेवली आहेत. ज्युनियर तसेच महिला खेळाडूंसाठी ते आंदोलन करीत आहेत असे सातत्याने बोलले जाते, पण त्यामुळे लाखो कुस्तीपटूंची कारकीर्द पणाला लागली आहे. कुस्ती संघटनेतील मोठ्या पदासाठी त्यांच्याकडून सर्व काही करण्यात येत आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com