Video : किळसवाणं! 200 खेळाडूंना टॉयलेटमध्ये वाढलं जेवण

कबड्डी टूर्नामेंट दरम्यान खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढल्याचा व्हिडिओ व्हायरल
Kabaddi players lunch in the toilet
Kabaddi players lunch in the toilet sakal

Saharanpur Kabaddi Tournament Viral Video : यूपीच्या सहारनपूरमध्ये कबड्डी टूर्नामेंट दरम्यान खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सहारनपूर येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये खेळाडूंचे भोजन तयार करून ते शौचालयात ठेवण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 200 खेळाडूंना हेच जेवण देण्यात आले. एवढेच नाही तर खेळाडूंना दिलेला भातही अर्धवट शिजवून दिला होता. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Kabaddi players lunch in the toilet
Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला T20 सामना, पंत की कार्तिक कोणाला मिळेल संधी?

सहारनपूरच्या डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममधील टॉयलेटमध्ये 200 हून अधिक कबड्डीपटूंचे जेवण तयार करून ठेवण्यात आले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शनिवारपासून टॉयलेटच्या फरशीवर ठेवलेल्या राइस प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Kabaddi players lunch in the toilet
IND vs AUS : टीम इंडिया खेळणार नवीन जर्सीमध्ये, जाणून घ्या 'फ्री' सामना कुठे अन् कधी पाहायचा

सहारनपूर जिल्ह्यात तीन दिवसीय राज्यस्तरीय 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेला सुरु झाली आहे. खेळाडूंच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्टेडियममध्येच करण्यात आली होती. सोशल मीडियावर चित्रे समोर आल्यानंतर, खेळाडूंनी आरोप केला की, स्विमिंग पूलजवळ भात शिजवला गेला. त्यानंतर तो एका मोठ्या प्लेटमध्ये काढून टॉयलेटच्या फरशीवर ठेवला. भाजी आणि पुर्‍याही तयार करून टॉयलेटमध्ये ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

याप्रकरणी आता चौकशी सुरू करण्यात आली असून सहारनपूरचे क्रीडा अधिकारी अनिमेश सक्सेना यांना प्रशासनाने निलंबित केले आहे. जिल्हा दंडाधिकारी अखिलेश सिंह यांनीही एडीएमच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com