
Fight in Kabaddi Match Video Viral: प्रत्येक खेळामध्ये वाद-विवाद आणि भांडणे होतात. अगदी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील निर्णयामुळे सामने थांबलेले आपण पाहिले आहेत. पण प्रत्येक खेळाचे काही नियम असतात, त्या नियमांमध्ये राहुन आपल्याला हे खेळ खेळायचे असतात. अपांयर्सने दिलेल्या निर्णयाचा आदर राखून खेळ पुढे चालू ठेवायचा असतो. पण चक्क इथे आपल्याला अंपायर्सच नियम तोडताना पाहायला मिळत आहेl. पंजाबमध्ये एक अनोखा प्रकार पाहायला मिळला, नियम पायदळी तुडवत थेट मॅच रेफरीनेच हल्ला केला आणि दोन महिला कबड्डी संघांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली.