NZ vs IND : टी-20 मालिकेआधीच विल्यमसनने उचलली ट्रॉफी; पांड्या आवरत बसला टेबल, Video व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kane Williamson saves series trophy from falling down

NZ vs IND : टी-20 मालिकेआधीच विल्यमसनने उचलली ट्रॉफी; पांड्या आवरत बसला टेबल, Video व्हायरल

India vs New Zealand : भारतीय संघ मिशन 2024 टी-20 विश्वचषक सुरू करणार आहे. टीम इंडिया शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यामध्ये हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यामुळे टीम इंडियामध्ये बदल सुरू झाला असून आता रोहित शर्मासह काही सीनियर खेळाडूंना टी-20 फॉरमॅटमधून वगळण्यात येणार असून केवळ हार्दिकला कर्णधारपदी बढती देण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना वेलिंग्टन येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे कारण दोन्ही संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाले होते. अशा स्थितीत दोन्ही संघ आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करतील. मालिकेपूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी वेलिंग्टनमध्ये अनोख्या पद्धतीने फोटोशूट केले. हार्दिक आणि विल्यमसनने वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमजवळ फोटोसाठी पोज दिली.

हेही वाचा: IND vs NZ : टीम इंडियासाठी ऋषभ पंत करणार ओपनिंग ? शर्यतीत हे पण दिग्गज खेळाडू!

फोटोशूट दरम्यान, जेव्हा दोघेही ट्रॉफीसोबत पोज देत होते, तेव्हा वाऱ्याचा एक सोसावा आला आणि ट्रॉफी ठेवलेल्या डेस्क पडायला लागला. अशा स्थितीत ट्रॉफीचा तोल गेला. विल्यमसनने वेळीच ट्रॉफी पकडली आणि पांड्याच्या हातीत टेबल राहिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते विल्यमसनच्या प्रतिक्रिया वेळेबद्दल खूप बोलत आहेत. 18, 20 आणि 22 नोव्हेंबरला टी-20 मालिकेतील तीन सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. पहिला वनडे 25 नोव्हेंबर, दुसरा वनडे 27 नोव्हेंबर आणि तिसरा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला खेळवला जाईल. शिखर धवन वनडे मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.