Kane Williamson: न्यूझीलंड क्रिकेट संघात भूकंप! पाकिस्तान दौऱ्यापूर्वी विल्यमसनने सोडले कर्णधारपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kane Williamson steps down as New Zealand Test captain

Kane Williamson: न्यूझीलंड क्रिकेट संघात भूकंप! पाकिस्तान दौऱ्यापूर्वी विल्यमसनने सोडले कर्णधारपद

Kane Williamson Steps Down Test Captain : केन विल्यमसनने न्यूझीलंड कसोटी संघाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी किवी संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने गुरुवारी सांगितले की, केन विल्यमसनने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथी संघाचे नेतृत्व करेल. टॉम लॅथमला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. केन विल्यमसन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे.

हेही वाचा: Arjun Tendulkar: भाऊ अर्जुनच्या शतकावर बहीण साराची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

केन विल्यमसनने एक निवेदन जारी करून सांगितले की, वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाशी बोलून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंडचा 31वा कसोटी कर्णधार असेल. सौदीच्या नेतृत्वाखाली किवी संघ या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानला भेट देईल, जिथे न्यूझीलंड संघ यजमान संघासोबत 2 कसोटी आणि 3 वनडे मालिका खेळेल. ही मालिका 26 डिसेंबर ते 13 जानेवारी 2023 पर्यंत चालणार आहे.

कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यानंतर केन विल्यमसनने 6 वर्षांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. 2016 मध्ये त्याच्याकडे ब्रेंडन मॅक्युलमनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. विल्यमसनने 38 कसोटी सामन्यांमध्ये किवी संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान न्यूझीलंडने 22 कसोटी सामने जिंकले. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने गेल्या वर्षी अंतिम फेरीत भारताचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 जिंकली होती.

टॅग्स :Kane Williamson