esakal | आय लव्ह यू यश! कपिल पाजींना अश्रू अनावर
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil Dev and  Yashpal Sharma

आय लव्ह यू यश! कपिल पाजींना अश्रू अनावर

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाला पहिला वहिला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची वाटा उचलणारा हिरो आपल्यातून अचानक निघून गेला. यशपाल शर्मा यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्रीडा वर्तुळात शोककळा पसरलीये. क्रिकेट जगतासह अन्य क्षेत्रातील मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना ही बातमी कळल्यानंतर जोरदार धक्का बसला. एका न्यूज चॅनलवर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. (kapil dev cried after hearing news of yashpal sharma death )

मंगळवारी ह्रदय विकाराच्या झटक्याने यशपाल शर्मा यांचे निधन झाले. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने पीटीआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. कपिल देव त्यांच्या कामानिमित्त मुंबईला आले आहेत. न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांना यशपाल शर्मा गेल्याची बातमी मिळाली. हे ऐकून त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यांना अश्रू अनावर झाले.

टीव्ही चॅनेलवरील लाईव्ह शोमध्येच त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. मुंबईवरुन तात्काळ अंत्यदर्शनासाठी जाईन, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ''आय लव्ह यू यश.... इनिंग चांगली खेळलीस.'' अशा शब्दांत त्यांनी आपल्या वर्ल्ड कप विजेत्या टीममधील सहकाऱ्याबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या.

विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून यशपाल शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघातील हिरोला आपण गमावले, अशी भावना विरुने व्यक्त केली आहे. विद्यमान केंद्रीय क्रीडा मंत्री आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी देखील यशपाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1983 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारे ते दुसरे फलंदाज होते. क्रिकेट कारकिर्दीनंतर अंपायरिंग आणि राष्ट्रीय संघाच्या निवड समितीमध्ये त्यांते मोलाचे योगदान लाभले, असा उल्लेख करत अनुराग ठाकूर यांनी यशपाल शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.

loading image