तू 50 टक्के जरी वडिलांसारखा झालास तर... अर्जुनबाबत कपिल देव यांचे वक्तव्य

सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू त्याचे वडील असताना त्याला आपण सांगणारे कोण आहे?
kapil dev makes big statement sachin tendulkar son arjun tendulkar
kapil dev makes big statement sachin tendulkar son arjun tendulkar

Kapil Dev On Arjun Tendulkar: आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) पाच वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) गुणतालिकेत या हंगामात तळात रहावे लागले होते. मुंबईचा संघ यंदाच्या हंगामात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरमुळे कायम चर्चेत राहिला आहे. मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) आयपीएल 2022 च्या हंगामात खेळण्याची संधी काही मिळाली नाही. साखळी सामन्यातील अखेरच्या सामन्यापर्यंत अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण (IPL Debut) करणार हीच चर्चा सुरु होती. कपिल देवने अर्जुन तेंडुलकरवर मोठे वक्तव्य केले आहे. (kapil dev makes big statement sachin tendulkar son arjun tendulkar)

kapil dev makes big statement sachin tendulkar son arjun tendulkar
पाकविरूद्ध 'अशीच' संघनिवड करू नका, अख्तरचा भारताला सल्ला

कपिल देव यांना वाटत की, अर्जुनचे आडनाव तेंडुलकर असल्यामुळे त्याला नेहमीच अतिरिक्त दबाव त्याच्यावर जाणवतो. सर्वजण त्याच्याबद्दल बोलत आहेत, कारण तो सचिनचा मुलगा आहे. त्याला त्याचे क्रिकेट खेळू द्या आणि त्याची सचिनशी तुलना करू नका. तेंडुलकरचे नाव घेण्याचे काही फायदे आणि काही तोटे पण आहेत. डॉन ब्रॅडमनच्या मुलाने त्याचे नाव बदलले कारण तो अशा प्रकारचा दबाव सहन नाही करू शकला. प्रत्येकाला अपेक्षा होती की तो त्याच्या वडिलांसारखा खेळत असेल.

kapil dev makes big statement sachin tendulkar son arjun tendulkar
French Open : सचिन तेंडुलकरला नदालची 'माणुसकी' भावली

त्यापुठे बोलताना कपिल देव म्हणता की, त्यामुळे अर्जुनवर असा कोणता दबाव आणू नका. सचिन तेंडुलकरसारखा महान खेळाडू त्याचे वडील असताना त्याला आपण सांगणारे कोण आहे? मी अर्जुनला एकच सांगू इच्छितो, तो तुझ्या खेळाचा आनंद घे. कोणाला काय सिद्ध करण्याची गरज नाही. जर तू तुझ्या वडिलांसारखे 50 टक्के बनू शकला, तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. तेंडुलकरचे नाव समोर आले की आपल्या आशा उंचावतात कारण सचिन हा महान खेळाडू होता.

kapil dev makes big statement sachin tendulkar son arjun tendulkar
On This Day : 29 वर्षापूर्वी वॉर्नने टाकलेला तो चेंडू ठरला 'बॉल ऑफ द सेंचुरी'

आयपीएल 2022 मुंबई इंडियन्ससाठी हे एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. असे असूनही सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संपूर्ण स्पर्धेत संधी मिळाली नाही. 22 वर्षीय अर्जुनने आपल्या करिअरमध्ये आपल्या घरच्या टीम मुंबईसाठी फक्त दोन टी-20 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने IPL मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांना खरेदी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com