Veda Krishnamurthy : भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीला रणजीपटूने केले प्रपोज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Veda Krishnamurthy Arjun Hoysala

Veda Krishnamurthy : भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीला रणजीपटूने केले प्रपोज

Veda Krishnamurthy : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे टीम इंडिया तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र वेदा कृष्णमूर्ती या संघाचा भाग नाहीये. सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात आहे. मात्र ही व्हेकेशनवर असलेली वेदा नुकतीच चर्चेत आली. कर्नाटकचा रणजीपटू अर्जुन होएसलाने वेदा कृष्णमूर्तीला सुंदर अशा हिल स्टेशनवर प्रपोज केले. याचे फोटो अर्जुनने इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केले असून ते सध्या व्हायरल होत आहेत. (Karnataka Ranji Player arjun hoysala Propose Indian Women Cricketer Veda Krishnamurthy)

अर्जुनने वेदा कृष्णमूर्तीला प्रपोज करतानाचे फोटो शेअर करत त्याला 'आणि तिने होकार दिला.' असे कॅप्शन दिले. फोटोमध्ये वेदा कृष्णमूर्तीला अर्जुनने प्रपोज केल्यावर विश्वासच बसला नसल्याचे दिसून येते. यानंतर वेदाने अर्जुनला मिठी मारली. दोघांनीही एकमेकांना रिंग घातली. दरम्यान, वेदाला टीम इंडियातील अनेक क्रिकेटपटूंनी आयुष्याच्या नव्या टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Web Title: Karnataka Ranji Player Arjun Hoysala Propose Indian Women Cricketer Veda Krishnamurthy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..