Waseem Bashir : भारतीय संघात अजून एक 'स्पीड गन' दाखल होणार; पहलगाम एक्सप्रेसचा VIDEO व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Waseem Bashir Bowling Video

Waseem Bashir : भारतीय संघात अजून एक 'स्पीड गन' दाखल होणार; पहलगाम एक्सप्रेसचा VIDEO व्हायरल

Waseem Bashir Bowling Video : भारतीय संघात अत्यंत वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज नाहीत असे जगभरातील अनेक माजी खेळाडू म्हणत असतात. नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील अशीच चर्चा सुरू होती. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग 150 kmph वेगाने गोलंदाजी करू शकत नाही. भारताला आयपीएलमधून उमरान मलिकसारखा वेगवान गोलंदाज मिळाला आहे. मात्र त्याची ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकपसाठी निवड करण्यात आली नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अजून एका काश्मिरी वेगवान गोलंदाजाची चर्चा सुरू आहे. त्याच्या वेगवान माऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या काश्मिरी स्पीडगनचे नाव आहे वसीम बशीर. 22 वर्षाच्या या वेगवान गोलंदाजाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो उमरान मलिकसारखाच वेगाने गोलंदाजी करण्यात तरबेज आहे. असं ऐकण्यात आलं आहे की तो सहज 150 kmph वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे जम्मू काश्मीरमधून भारताला अजून एक स्पीडगन मिळण्याची शक्यता वाढली आहे.

हेही वाचा: Ravi Shastri : रवी शास्त्रींच चाललयं काय? द्रविडवर आधी निशाना आता समर्थन

पहलगाम एक्सप्रेस नावानेही प्रसिद्ध

वसीमला क्रिकेट खेळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. काश्मीरमधील खराब परिस्थिती, शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्यामुळे दुर्गम आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममधील जास्तीजास्त मुले ही पर्यटनसंबंधीच्या कामातून रोजगार मिळवतात. वसीमने देखील आपले नियमीत शिक्षण सोडून डिस्टन्स एज्युकेशनद्वारे आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मात्र क्रिकेट खेळणे त्याने सोडले नाही. वसीमने केकेआरसाठी 2021 मध्ये ट्रायल दिली होती.

शालेय दिवसांपासूनच तो जिल्हा आणि राज्यस्तरीय क्रिकेट खेळत आला आहे. तो 19 आणि 23 वर्षाखालील वयोगटातील राज्यस्तरीय क्रिकेट खेळला आहे. गावात त्याच्या क्रिकेटला फारसा वाव मिळत नसल्याने तो अनंतनाग आणि बिजबेहरा सारख्या दुसऱ्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी जात होता.

हेही वाचा: Cristiano Ronaldo : रोनाल्डो निवृत्ती घेणार; मुलाखतीत मेस्सीबद्दल काय म्हणाला?

वसीमने अनेक मोठ्या क्रिकेटपटूंना आपल्या गतीने प्रभावित केले आहे. वसीमने 12 वी पास केल्यानंतर डिस्टन्स एज्युकेशनद्वारे आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्याच्या खेळावर देखील परिणाम होणार नाहीये.

वसीम दोन वर्षापूर्वी बंगळुरूमधील कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेटमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी देखील गेला होता. काश्मीरमध्ये क्रिकेट खेळण्याबाबतच्या सुविधांचा अभाव असल्याने तो या कॅम्पमध्ये आला होता. वसीमला आयपीएल आणि देशाकडून खेळायचे आहे. तो म्हणाला की, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. माझेही तेच स्वप्न आहे.