
बंगळूर : भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक खालिद जमील यांनी सोमवारी नेशन्स फुटबॉल करंडकासाठी २३ खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. खालिद जमील यांच्या मार्गदर्शनात भारतीय फुटबॉल संघ पहिल्यांदाच रणांगणात उतरणार आहे. अनुभवी खेळाडू सुनील छेत्रीला या संघात स्थान मिळालेले नाही.