
India won Against Iran Kho-Kho World Cup Womens : इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने कालचा अध्याय आज पुढे चालू ठेवत इराणला अक्षरशः लोळवल. दक्षिण कोरियाविरुद्धच्या ऐतिहासिक १७५-१८ अशा विजयानंतर, भारतीय महिला खो-खो संघाने इराणला ८४ गुणांनी पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. कालच्या पत्रकार परिषदेत भारताची कर्णधार प्रियंका इंगळेने यापुढेही भारत गुणांची उधळण करेल असे सांगितले होते.