IND vs WI T20 : टीम इंडियाला मोठा धक्का, KL राहुल-अक्षर पटेल आउट | KL Rahul and Axar Patel ruled out of t20 series | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul and Axar Patel ruled out of  t20 series

IND vs WI T20 : टीम इंडियाला मोठा धक्का, KL राहुल-अक्षर पटेल आउट

Ind Vs Wi, T20 Series: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 16 फेब्रुवारीला कोलकाताच्या मैदानातून या मालिकेला सुरुवात होणार आहे. उप-कर्णधार लोकेश राहुल आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांनी टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.

बीसीसीआयने (BCCI) यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) दुखापतीचा उल्लेख केला आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी लोकेश राहुलला दुखापत झाली होती. स्ट्रेन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो टी-20 मालिकेत खेळणार नाही. कोरोनातून सावरुन अक्षर पटेलनं सरावाला सुरुवात केली आहे. पण त्यालाही टी-20 मालिकेला मुकावे लागणार आहे.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, वाशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.

टीृ20 मालिका कुठे आणि कधी

• पहला टी-20 सामना: 16 फ्रेबुवारी

• दुसरा टी-20 सामना: 18 फ्रेबुवारी

• तिसरा टी-20 सामना: 20 फ्रेबुवारी

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सर्व सामने कोलकाता येथील ईडन गार्डनच्या मैदानात रंगणार आहेत.

Web Title: Kl Rahul And Axar Patel Ruled Out Of T20 Series India Vs West Indies Team

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top