KL Rahul Athiya Shetty Marriage : लग्नात कोहलीनं दिलं 'विराट' गिफ्ट, तर, धोनीनं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul Athiya Shetty Marriage

KL Rahul Athiya Shetty Marriage : लग्नात कोहलीनं दिलं 'विराट' गिफ्ट, तर, धोनीनं...

KL Rahul Athiya Shetty Marriage : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

या दोघांच्या लग्नानंतर क्रीडा जगत आणि सिनेजगतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या दोघांच्या लग्नात दोघांच्या मित्र-मैत्रिणींकडून भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला.

कुणी काय दिलं गिफ्ट

केएल आणि अथियाच्या लग्नानिमित्त अनेकांनी महागडी गिफ्ट्स दिली आहेत. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली, कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनी यांच्यासह अनेक दिग्गजांचा सहभाग आहे.

विराट कोहलीने केएल राहुल आणि अथिया शेट्टीला लग्नानिमित्त दोन 2.17 कोटी रुपयांची BMW कार भेट दिली आहे. तर कॅप्टन कुल म्हणून ओळख असलेल्या धोनीने दिले सर्वात खास गिफ्ट दिले आहे.

महेंद्रसिंग धोनीला बाइकची खूप आवड आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. धोनीकडे डझनभर बाइक्सचं अप्रतिम कलेक्शन आहे.

हीच आवड जपत धोनीने राहुल आणि अथियाच्या लग्नाच्या निमित्ताने नवविवाहित जोडप्याला कावासाकी निन्जा बाईक भेट दिली आहे.

विशेष म्हणजे ही बाईक धोनीच्या स्वतःच्या बाईक कलेक्शनमधील असून, या बाईकची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे.