VIDEO : सुर्यावर KL राहुल भडकला; चूक कुणाची तुम्हीच ठरवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 IND vs WI kl rahul run out

VIDEO : सुर्यावर KL राहुल भडकला; चूक कुणाची तुम्हीच ठरवा!

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुल (KL Rahul) आपला सहकारी सुर्यकुमार (Suryakumar Yadav) यादववर भडकल्याचे दिसले. भारतीय संघाने या सामन्यात अवघ्या 43 धावांत आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. भारतीय संघ संकटात असताना राहुल आणि सुर्यानं चौथ्या विकेटसाठी 107 चेंडूत 91 धावांची भागीदारी करुन डाव सावरला.

संघाचा डाव सावरल्यानंतर दोघांच्यात गोंधळ उडाला. भारतीय डावातील 30 व्या षटकात लोकेश राहुलनं (KL Rahul) फटका मारला आणि धाव घेण्यासाठी क्रीज सोडले. दोघांनी पहिली धाव वेगानं पूर्णही कली. सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुसरी धाव घेण्यासाठी पुन्हा मागे फिरला. लोकेश राहुलनेही त्याला होकार दिला. पण नंतर आपण दुसऱ्या धावेसाठी गडबड केल्याचे त्याला वाटले. तो थोडा थांबला आणि पुन्हा पळाला. यात त्याने विकेट गमावली. सुर्यकुमार यादवने त्याला धाव घेण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यामुळे तो त्याच्या संतापल्याचे दिसले. सुर्याही यावेळी थोडा निराश झाल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्या सामन्याला मुकलेल्या लोकेश राहुलनं दमदार कमबॅक केलं. त्याने 48 चेंडूत 49 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार खेचले. 48 धावांवर असताना दोन धावा घेताना त्याचे अर्धशतक अवघ्या 1 धावेनं हुकलं. वनडेत 49 धावांवर बाद होणारा भारताचा तो पाचवा फलंदाज ठरला. या आधी रवी शास्त्री ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात, दिनेश मोंगिया इंग्लंडविरुद्ध, मोहम्मद कैफ बांगलादेशविरुद्द तर राहुल द्रविड वेस्ट इंडीज विरुद्ध 49 धावांवर रन आउट झाले होते.

Web Title: Kl Rahul Runout Suryakumar Yadav Confusion India Vs West Indies 2nd Odi Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top