esakal | अमेरिकेचा बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा मुलीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Kobe Bryant

कोबीसोबत दुर्घटनेत मृत्यू झालेली त्याची तेरी वर्षाची मुलगी जिएन्ना ब्रायंट हिची बास्केटबॉल खेळाडू होण्याची इच्छा होती. कोबीच्या प्रत्येक सामन्यांना ती हजेरी लावत असे.

अमेरिकेचा बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा मुलीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : अमेरिकेचा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू आणि एनबीए स्टार कोबी ब्रायंट याचा त्याच्या 13 वर्षीय मुलीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियातील कॅलाबसेस येथे ही हेलिकॉप्टर दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोबी ब्रायंटसह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोब हा मांबा अकादमीमध्ये सरावासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. कोबी याच्यामागे पत्नी व नतालिया, बियांका आणि कापरी या अन्य तीन मुली आहेत. कोबी हा लॉस एन्जल्स लेकर्स या टीमकडून एनबीएमध्ये खेळत होता.  

कोबीसोबत दुर्घटनेत मृत्यू झालेली त्याची तेरी वर्षाची मुलगी जिएन्ना ब्रायंट हिची बास्केटबॉल खेळाडू होण्याची इच्छा होती. कोबीच्या प्रत्येक सामन्यांना ती हजेरी लावत असे. कोबी तीला बास्केटबॉलचे धडे देत असतानाचा त्यांचा 2019 मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याची माहिती मिळू शकली नाही.

loading image